Friday, March 20, 2015

गुढीपाडवा – शुभेच्छापत्रे



प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालीवाहन राजाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.
गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो. गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते व नंतर गुढी पाटावर उभी केली जाते.
– विकि

0 comments:

Post a Comment